News18 Lokmat

#quotes

Showing of 14 - 27 from 255 results
स्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...

बातम्याFeb 12, 2019

स्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...

सातारा, 12 फेब्रुवारी : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी त्यांच्या हटके स्टाईलने चर्चेत असतात. कधी कॉलर उडवून तर कधी डायलॉगबाजीने ते आपली झलक दाखवून देत असतात. आताही एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात भाषणावेळी अचानक गाऊ लागले. त्यांनी "हमे तुमसे प्यार कितना ए हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना" हे गाणं गायलं. उदयनराजेंच्या या गाण्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात भाषण करत होते. या भाषणा वेळी तुम्ही सगळे भाषण ऐकून कंटाळला असाल अस म्हणत त्यांनी चक्क गाणं म्हणायला सुरुवात केली.