#quotes

Showing of 27 - 40 from 1554 results
VIDEO : "...ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल," शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

महाराष्ट्रNov 1, 2018

VIDEO : "...ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल," शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई, 1 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यूज18 लोकमत’च्या ‘रायझिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. 'सामना'च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘सामना थोडीच सरकार चालवतं, सरकार तर मी चालवतो,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या खोचक टीकेनंतर आता शिवसेनेनेदेखील सामनातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close