#quotes

Showing of 1470 - 1483 from 1557 results
वकिलांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - डॉ.अभय बंग

बातम्याAug 23, 2011

वकिलांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - डॉ.अभय बंग

23 ऑगस्टज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी आयबीएन लोकमतला शनिवारी दिलेल्या मुलाखतीत वकिलांबाबत केलेल्या वक्तव्याला काही जणांनी आक्षेप घेतला होता. पण वकिलांच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया अभय बंग यांनी दिली. वकिलांबाबत आपल्याला पूर्ण आदर असून अनेक वकिलांनीच आपल्याला काही खटल्यांतून वाचवल्याचे अभय बंग यांनी म्हटलं आहे.अभय बंग यांचं स्पष्टीकरण"सपूर्ण वकिली व्यवसायाबद्दल मी बोलत नव्हतो शासनांनी अण्णांचे आंदोलन ज्या पध्दतीने हाताळले आहे हा त्यासंदर्भात होता. यामध्ये शासनातील दोन नावजलेले वकिल मंत्र्यांनी आपल्या वकिली बुध्दीमत्तेचा उपयोग सत्यासाठी न करता सत्तेसाठी केला. या विशिष्ट गैर वापराच्या संदर्भात अशा प्रकारच्या बुध्दीविक्रीया आणि शरीरविक्रीयात काय फरक आहे असा प्रश्न मी विचारला. माझ्या वकिल मित्रांनी गैरसमज करून घेऊ नये किंवा वाईट ही वाटून घेऊ नये. वकिलांच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. - डॉ.अभय बंग

Live TV

News18 Lokmat
close