#protest

Showing of 27 - 40 from 137 results
VIDEO : मराठा आंदोलकांसाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'स्पेशल प्लान'

बातम्याAug 9, 2018

VIDEO : मराठा आंदोलकांसाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'स्पेशल प्लान'

कोल्हापूर, 09 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सातारा आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आलाय ..आज सकाळपासून या बंदला सुरुवात झाली असून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा बंद पाळण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे ..आजच्या बंदचा परिणाम कोल्हापूर विभागातील एसटीच्या फेऱ्यांवरही झालाय. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदकाळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केल आहे. तसेच कोल्हापूर विभागांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.