Elec-widget

#programme

VIDEO : वर्धापनदिनी या शाळेनं मुलींना दिली अनोखी भेट

व्हिडिओJan 28, 2019

VIDEO : वर्धापनदिनी या शाळेनं मुलींना दिली अनोखी भेट

पुणे, 28 जानेवारी : इंदापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं अनोखा वर्धापनदिन साजरा करून इतर शाळांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय. अतिशय हालाकिच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या शाळेतील 51 विद्यार्थीनींच्या नावे प्रत्येकी 5000 रूपये ठेव म्हणून जमा करण्यात आले. बेताच्या परिस्थितीमुळे इच्छा असूनही अनेक मुलिंना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं, त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. अशा गरिब कुटुंबातील लेकींना आर्थिक आधार मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. वर्धापन दिनाचं औचित्य साधून या 51 विद्यार्थिनींना बँकेत जमा केलेल्या ठेविंच्या पावत्या सुपूर्द करण्यात आल्या. ही अनोखी भेट मिळाल्यामुळे विद्यार्थीनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.