#producer

VIDEO: कांद्यानेच मंत्र्यांना शुद्धीवर आणा आणि परत कांदा फेकून मारा - राज ठाकरे

बातम्याDec 20, 2018

VIDEO: कांद्यानेच मंत्र्यांना शुद्धीवर आणा आणि परत कांदा फेकून मारा - राज ठाकरे

पेठ (नाशिक), 20 डिसेंबर - सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे कांदा फेकून मारा असा सल्ला पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. सरकार दिलासा देत नसेल तर कांदा रस्त्यावर फेकू नका तो दिसेल त्या मंत्र्याला फेकून मारा. त्याच कांद्यानं शुद्धीवर आणा आणि परत मारा असं राज म्हणाले आहेत. त्याचबरोबर आपल्या पोतडीतल्या गोष्टी निवडणूक काळात काढू असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. तर एकीकडे, सरकारने केलेल्या 200 रुपये क्विंटल अनुदानवर मी समाधानी नाही असंही राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधल्या सभेत बोलत होते.