Home » Tag » Pro Kabaddi

Pro Kabaddi League 2021-22

    प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमाला 22th डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या चाहत्यांना मैदानातला थरार अनुभवता येणार आहे. या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. प्रत्येक टीमला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. बंगाल वॉरियर्स, बँगलुरू बूल्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पॅन्थर्स, पटणा पायरट्स, पुणेरी पलटन, तामीळ थलायवास, तेलुगू टायटन्स, यू मुंबा आणि यूपी योद्धास या टीम या मोसमात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत पटणा पायरट्सनी सर्वाधिक 3 वेळा प्रो कबड्डी लीगची ट्रॉफी पटकावली आहे, तर यू मुंबा, बंगाल वॉरियर्स, बँगलुरू बूल्स आणि जयपूर पिंक पॅन्थर्स यांना प्रत्येकी 1-1 वेळी चॅम्पियन बनता आलं आहे. पटणा पायरट्सना लागोपाठ तीनवेळा ट्रॉफी पटकावण्यात यश आलं होतं. 2014 साली प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली होती, यानंतर अवघ्या काही काळातच ही लीग मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. 2019 साली अखेरचा मोसम खेळवला गेला, त्यावेळी बंगाल वॉरियर्सचा विजय झाला होता. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात प्रदीप नरवालने सर्वाधिक 1160 रेड पॉईंट्स कमावले आहेत, तर मनजीत चिल्लरच्या नावावर सर्वाधिक 339 टॅकल पॉईंट्स आहेत.
    याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये प्रो कबड्डी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. प्रदीप नरवाल याच्यावर लीगच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली. यूपी योद्धासनी नरवालला 1.60 कोटी रुपयांना विकत घेतलं. नरवालची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.
    कोरोना व्हायरसमुळे यंदाची स्पर्धा फक्त कर्नाटकमध्येच आयोजित करण्यात येणार आहे, तसंच स्पर्धेदरम्यान सगळ्या टीमना बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे.

    गुणतालिका

    TeamsPWLTPTS