मुंबई, 27 मार्च : यंदाच्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंदाजसुद्धा व्यक्त केला. भाजप किंवा काँग्रेस कुणालाच बहुमत मिळणार नाही. त्यामुळे आघाडीला पर्याय नसणार असंही ते म्हणाले. भाजपला साधारण किती जागा मिळतील याविषयीही विश्लेषण केलं. न्यूज 18 लोकमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात पृथ्वीराज बोलत होते.