#pramod mahajan

VIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे

महाराष्ट्रFeb 23, 2019

VIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 23 फेब्रुवारी : औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे या ना त्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे. प्रमोद महाजनांना अत्यवस्थ असताना आपल्याला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. नाहीतर प्रमोद महाजनांच्या नाडीवर हात ठेऊन जप करून त्यांना वाचवलं असतं असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. विशेष म्हणजे, खैरे यांनी हा दावा एखाद्या प्रचार सभेत केला नाही तर राज्य सरकारच्या आरोग्य शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टरांच्या समोर केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close