News18 Lokmat

#police

Showing of 79 - 92 from 303 results
VIDEO : संतप्त महिलांनी केली पोलिसांची पळता भुई थोडी

व्हिडिओDec 22, 2018

VIDEO : संतप्त महिलांनी केली पोलिसांची पळता भुई थोडी

मुजफ्फरपुर, 22 डिसेंबर : बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील कटरा पोलीस ठाण्यांतर्गत एका युवकाची हत्या झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला केला आणि पोलीस व्ह्रॅनची नासधूस केली. रघुनाथ राम यांचा एकुलता एक मुलगा अशोक हा घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी एका शेतात त्याचं प्रेतच आढळून आलं. माहिती मिळताच पोलीस गावांत दाखल झाले. पण या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला केला. यापूर्वीसुद्धा गावात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने ग्रामस्थांनी असा पवित्रा घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी हल्का लाठीचार्ज करताच, संतप्त महिलांनी त्यांची पळवून-पळवून धुलाई केली. यामुळे पोलिसांची पळता भुई झाली थोडी अशी अवस्था झाली होती.