News18 Lokmat

#police

Showing of 66 - 79 from 303 results
VIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं

व्हिडिओJan 20, 2019

VIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं

मुंबई, 20 जानेवारी : सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा गावातील शंभर ते दीडशे शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मोर्चा घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र पोलिसांनी हा मोर्चा रविवारी मुंबईतल्या मानखूर्दजवळ अडवला आहे. सध्या त्यांना स्थानिक शाळेत नेण्यात आलं असून, उद्योगमंत्री सोमवारी त्यांची भेट घेणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन केलं. मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यात आल्याचा आरोप होतोय. मात्र, जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नोकरी मिळावी अशी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. 12 जानेवारीला शेतकऱ्यांनी त्यांचं गाव सोडलं आणि त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केली. आता सरकार या शेतकऱ्यांची दखल घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..