पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) भाजपच्या वाटेवर आहे. येत्या 7 मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली आहे.