पिंपरी-चिंचवड, 3 डिसेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यातील वधू- वर हे वयाची पंचाहत्तरी पार केलेले आजी आजोबा होते. या सगळ्या आजी आजोबांनी सुखी संसाराची 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या विवाहसोहळ्यात हे आजीआजोबा पुन्हा एकदा बोहल्यावर चढले. ज्येष्ठ नागरिक संघ मासूळकर कॉलनीतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे आजी-आजोबा पुन्हा बोहल्यावर चढले.