News18 Lokmat

#pankaja munde

Showing of 66 - 79 from 338 results
VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं अपघातात निधन होऊच शकत नाही - धनंजय मुंडे

मुंबईFeb 6, 2019

VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं अपघातात निधन होऊच शकत नाही - धनंजय मुंडे

06 फेब्रुवारी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचं तुम्ही राजकारण करतात, या आरोपावर धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे. 'गोपीनाथ मुंडे हे माझे काका होते. आमच्यात रक्ताचे नाते होते. मुंडे साहेबाचं जेव्हा अपघात झाला त्यानंतर सीबीआयने चौकशी करून आपला अहवाल दिला. त्यात हा अपघात असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो मान्य करणे साहजिकच आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं त्या अहवालाबद्दल समाधान झाले नाही. चार वर्षात एका केंद्रीय मंत्र्यांचं निधन होतं, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे की, धडक देणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे. यात कुणाला तरी शिक्षा झाली पाहिजे होती ना? चार वर्षांत न्यायालयात काही झाले नाही. त्यांच्या पीएची ड्रायव्हरची चौकशी का झाली नाही?' असा सवाल उपस्थितीत करत गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नाही हा घातपात असल्याचा संशय मुंडेंनी व्यक्त केला. जोपर्यंत या प्रकरणाचा खुलासा होणार नाही तोपर्यंत याबद्दल संशय व्यक्त केला जाईलच, असंही ते म्हणाले.