बीड, 27 जानेवारी : लोकसभेची निवडणूक आली की बीडमध्ये नगर - परळी रेल्वेचा मुद्दा हा हमखास येतोच आणि आताही तेच होताना दिसत आहे. कारण गेल्या निवडणुकीत रेल्वेनं उमेदवारी अर्ज भरण्याचं आश्वासन मुंडे भगिणी यावेळीही पूर्ण करू शकणार नाहीत. कारण रेल्वेचं बरचसं काम अजूनही बाकी आहे. बीडच्या वेशीपर्यंत रेल्वे आल्याचं पंकजाताई कितीही ठासून सांगत असल्यातरी वास्तव वेगळंच आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास जाण्यास अजून किमान तीन वर्षे तरी लागतील, असं रेल्वे कृती समितीचं म्हणणं आहे.