Palghar

Showing of 40 - 53 from 153 results
VIDEO: पालघरमधील सत्यम बुक कंपनीला भीषण आग

महाराष्ट्रMar 24, 2019

VIDEO: पालघरमधील सत्यम बुक कंपनीला भीषण आग

पालघर, 24 मार्च : पालघरमधील सत्यम बुक कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल तयार करणाऱ्या या कंपनीला लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट उठत असल्याचं दिसून येत आहे. याठिकाणी सर्वप्रथम ट्रकला आग लागल्याची माहिती असून, त्यानंतर परिसरातल्या तीन कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पोलीस प्रशासन आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.