पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनाला पाठिंबा देण्यावरुन मनसे चित्रपट सेनेच्या नेत्यांमध्येच संभ्रम दिसून येतोय. काल मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी पद्मावत बाबत भूमिका स्पष्ट करताना, आम्ही गरज पडल्यास पद्मावतला संरक्षण पुरवू असं म्हटलं होतं. पण शालिनी ठाकरेंची ही वैयक्तिक भूमिका असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलंय.