नवी मुंबई, 22 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधी लाट उसळली असून नवी मुंबईतील तवा हॉटेलच्या मालकानं आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर ठेवली आहे. या हॉटेलात येणाऱ्या ग्राहकानं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यास त्याला बिलातून चक्क 10 टक्के सूट दिली जाते. नवी मुंबईच्या खारघर परिसरात हे हॉटेल असून या ऑफरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ग्राहक बिल देताना पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देतात. पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी या हॉटेल मालकानं हा अनोखा मार्ग निवडला.