मुंबई, 4 एप्रिल : कोकणातील राणे आणि राऊत लढतीमध्ये 'खंबाटा एव्हिएशन'च्या मुद्यानं पुन्हा डोकं वार काढलं आहे. ''विनायक राऊतांनी कामगारांची पगारवाढ थांबवून कंपनीकडून पैसे घेतले आणि पैसे थेट मातोश्रीवर पोहचवले,'' असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे. तर 'खंबाटा एव्हिएशन'च्या आर्थिक डबघाईला तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकारच जबाबदार असल्याचं विनायक राऊत म्हणाले.