News 2

Showing of 53 - 66 from 1095 results
VIDEO : बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बॅनरबाजीने खळबळ

व्हिडीओFeb 13, 2019

VIDEO : बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बॅनरबाजीने खळबळ

जितेंद्र जाधव, 13 फेब्रुवारी : गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'बारामती लोकसभा मतदार संघ जिंका आणि बारामती देखील कमळ फुलवा', असं आवाहन केलं होतं. मात्र, बारामतीकरांनी प्रखर विरोध करीत बारामती पंचायत समिती, नगरपालिका आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी 'बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही' अशा आशयाचे फलक लावण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे बॅनर कुणी लावले आणि का लावले याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.