नवी मुंबई, 25 जानेवारी : नवी मुंबईतल्या आयनोक्स थिएटरबाहेर ठाकरे शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. ठाकरे फिल्मचं पोस्टर लावलं नसल्यानं संतप्त शिवसैनिकांनी गोंधळ घातला. इतर हिंदी चित्रपटांचे पोस्टर असल्यानं आणि ठाकरे फिल्मचं पोस्टर नसल्यानं शिवसैनिक नाराज झाले. सकाळी 8 वाजताचा शो शिवसैनिकांनी थांबवला आहे.