#ncp

Showing of 66 - 79 from 1780 results
VIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे

व्हिडिओJan 16, 2019

VIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे

नाशिक, 16 जानेवारी - राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांची सुरक्षा कमी केल्यानं राष्ट्रवादीनं राज्य सरकारला फैलावर घेतलं आहे. नाशकातील परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडलेत. भुजबळांना सनातनपासून धोका असल्याचं ते म्हणाले. आमदार असल्याचं कारण देत भुजबळांची 'वाय प्लस' सुरक्षा कमी करण्यात आली असून, भुजबळांच्या सुरक्षेसाठी केवळ एकच अंगरक्षक कायम ठेवण्यात आला आहे. भुजबळ राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतली गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. यामुळे त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा होती. मात्र, 14 जानेवारीला भुजबळांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. पाहुया यासंदर्भात काय म्हणाले धनंजय मुंडे..

Live TV

News18 Lokmat
close