गडचिरोली, 1 मे: गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद तर गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही कारणासाठी जीवघेणा भ्याड हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे हा दहशतवाद आहे. कोणत्याही कारणासाठी कोणत्याही रंगाचा दहशतवाद हा अमान्यच आहे. दहशतवादाची पाळमुळं कायमची नष्ट करायला हवीत. अशी प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी दिली आहे.