नवी मुंबई, 3 मार्च : नवी मुंबईमध्ये उद्घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावरून आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.