नवी मुंबई, 16 जुलै: हॉटेलमधील वापरण्यात आलेल्या तेलात फरसाण तयार केलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या जळालेल्या तेलातच फरसाण, चकली, वेफर्स, शेव, चिवडा, गाठी, फाफडा असे अनेक प्रकार तयार केले जातात. त्या खाद्य प्रदार्थांचा सप्लाय किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांना केली जाते. नवी मुंबईतील ऐरोलीजवळील गोठीवली गावात हा प्रकार सुरू असताना एका तरुणाच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकार एका तरुणानं कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याने रबाले पोलिसांना सांगितले मात्र पोलिसांनी फारसं सहकार्य न केल्याने अन्न आणि प्रशासन विभागाला सांगताच त्यांनी कारवाई करत खाद्य पदार्थ सील करण्यास सांगितले आहेत.