Nasik

Nasik - All Results

Showing of 1 - 14 from 157 results
राज ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या कार्यालयाची तोडफोड

बातम्याJan 24, 2019

राज ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या कार्यालयाची तोडफोड

नाशिक, 24 जानेवारी: नाशिक शहरातील एका मंडप डेकोरेटर्स व्यवसाय करणाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. हा व्यवसाईक मनसेचा कार्यकर्ता असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यालयाचे उद्घाटन केले होते. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर बुधवारी रात्री हा प्रकार घडला. भरवस्तीत असलेल्या या कार्यालयाची एका टोळक्याने तोडफोड केली. वर्गणी दिली नाही म्हणून ही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या दौऱ्यात या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या