#nashik

Showing of 1 - 14 from 784 results
VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

बातम्याJul 18, 2019

VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

मनमाड, 18 जुलै: साखळी बनून चालणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचे औरंगाबाद, जळगाव पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील येवला,नांदगांव,चांदवड सटाणा भागात आगमन झाले असून या अळीच्या प्रादुर्भावामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.एकीकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे उगवलेले पीक करपू लागल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.लष्करी अळीमुळे पीक हातातून गेल्याचे पाहून येवला तालुक्यातील मातुलठाण येथील निराश व हताश झालेल्या गजाजन आहेर या शेतकऱ्याने 4 एकर मका पिकावर ट्रॅकटर फिरविला.पावसाने फिरविलेली पाठ आणि लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मका पीक धोक्यात असल्याने नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Live TV

News18 Lokmat
close