नंदुरबार, 19 मार्च : नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. हाणामारीत लाठ्या काठ्यांसह हत्यारांचा वापर करण्यात आला. यात भाजपा नगरसेवक आनंद माळी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.