#nanded

Showing of 53 - 66 from 208 results
VIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य

व्हिडिओJan 16, 2019

VIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य

नांदेड, 16 जानेवारी : मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्याचं वाटप करण्यात येत आहे. नांदेडमधल्या काकांडी गावातही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते पशुखाद्याचं वाटप करण्यात येणार होतं. आदित्य ठाकरेंनी ग्रामस्थांशी बातचीत करत काही जणांना पशुखाद्य वाटलं. यानंतर आदित्य ठाकरेंची पाठ वळताच शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं पशुखाद्य लुटण्यासाठी गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली. सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गरजेनुसार गावकऱ्यांना हे पशुखाद्य वाटप करावं असं नियोजन होतं. मात्र, काकांडी मध्ये ज्याच्या हाताला लागेल तो पोतं उचलून नेत होता. काहींनी तर चाऱ्यांची पोती पळवून नेली. ग्रामस्थांच्या लुटालुटीमुळं अनेक गरजु शेतकऱ्यांना पशुखाद्य मिळालंच नाही.