News18 Lokmat

#mumbra

SPECIAL REPORT : कशासाठी, पोटगीच्या पैशासाठी?

मुंबईMar 5, 2019

SPECIAL REPORT : कशासाठी, पोटगीच्या पैशासाठी?

अजित मांढरे,ठाणे 05 मार्च : पोटगीच्या पैशांसाठी पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करणारी आई हिना शेख हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोटगीचे पैसे मिळायला उशीर झाला म्हणून हिना हिने मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून घटस्फोटीत पती फैय्याज शेख यांना पाठवला. तो अमानुष व्हिडिओ पाहून फैय्याज शेख हादरून गेले.