कोल्हापूर, 08 सप्टेंबर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटावर जाऊन पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यामधून 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते.