मुंबई, 14 फेब्रुवारी : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरता खास गाणं गाऊन गिफ्ट दिलं आहे. मुंबई पोलिसांसाठी आयोजित 'उमंग' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी खास रोमँटिक गाणं त्यांनी गायलं आहे. हे गाणं मुख्यमंत्र्यांच्या आवडीची आहेत आणि ती त्यांना नक्की आवडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्य म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत दिलखुलास दाद दिली.