Mumbai Metro Videos in Marathi

VIDEO : मेट्रो-3 प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, गाड्यांची केली तोडफोड

मुंबईNov 18, 2019

VIDEO : मेट्रो-3 प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, गाड्यांची केली तोडफोड

मुंबई, 18 नोव्हेंबर: शिवसेनेनं मेट्रो तीन प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेना आंदोलन करत आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना दररोजचा त्रास तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत. या संदर्भात शिवसेनेनं हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनादरम्यान गिरगावात मेट्रो 3 प्रकल्पासाठी सामानांची ने आण करणारे डंपर शिवसैनिकांनी फोडले. डंपरच्या काचा तोडण्यात आल्यात. तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना शिवसैनिकांनी पळवून लावलं.

ताज्या बातम्या