#mumbai 2

Showing of 66 - 79 from 2309 results
VIDEO : मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत तुफान राडा, पहा काय झालं ते...

व्हिडिओOct 21, 2018

VIDEO : मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत तुफान राडा, पहा काय झालं ते...

मुंबई, 21 ऑक्टोबर - जागा वाटपावरून पक्षांतर्गत किंवा मित्र पक्षाशी शाब्दिक वाद झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असले. मात्र पक्षाच्या बैठकीत बसण्याच्या जागेवरून राडा झाल्याचं कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट मुंबईत समोर येत आहे. मुंबईतल्या चांदिवलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फक्त बसण्याच्या जागेच्या वादावरून तुफान राडा पाहायला मिळाला. बैठक बाजुला राहिली आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खूर्च्या फेकायला सुरुवात केली. काल रात्री साकीनाकामध्ये चांदिवली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बसण्याच्या जागेवरुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी यांची इतरांशी बाचाबाची झाली. त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आलं. मात्र अमित तिवारींचे सहकारी पुन्हा बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यांनी धुडगूस घालत सभा उधळून लावली. दरम्यान, प्रकरण पोलिसात गेले असून अमित तिवारी यांच्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Live TV

News18 Lokmat
close