पुणे, 23 ऑक्टोबर : मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावी यासाठी मनसेच्या चित्रपट सेनेनं आज पुण्यात आंदोलन केलं. येत्या दोन दिवसात ट्रिपल सीट आणि हिरकणी हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, त्या मराठी चित्रपटांना प्राईम टाईमचे शो दिले जात नसल्यानं पुण्यातल्या किबे लक्ष्मी थिएटरबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. जर मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना शो मिळाले नाहीत तर राज्यभर आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल असा इशाराही मनसे चित्रपट सेनेनं दिला.