Mns Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 456 results
VIDEO : अन् खळ्ळ-खट्याॅक, मनसे रणरागिणींनी लंपट व्यवस्थापकाला धु-धु धुतले

व्हिडीओMar 5, 2019

VIDEO : अन् खळ्ळ-खट्याॅक, मनसे रणरागिणींनी लंपट व्यवस्थापकाला धु-धु धुतले

महेश तिवारी, चंद्रपूर, 05 मार्च : कार्यालयातील महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सचा व्यवस्थापक चेतन दाते याला मनसैनिकांनी चांगला चोप दिला. कार्यालयातील एका महिलेला कामावरून काढण्याची धमकी देत वारंवार खजील करणं आणि शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. आज या पीडित महिलेने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यावरून मनसैनिकांनी महिंद्रा फायनान्स कार्यालयात जाऊन लंपट व्यवस्थापकास चांगला चोप दिला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि पीडित महिला गेली. मात्र, व्यवस्थापकानं पीडितेचे पाय पकडून माफी मागितली.

ताज्या बातम्या