गेल्या आठवड्यात मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय. सुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.