सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट इथे केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे भारतीय हवाई दलाने सरकारकडे सुपूर्द केले आहेत. फोटोंसह दिलेल्या या पुराव्यांवरून असं स्पष्ट होतंय की, 80 टक्के बाँब ठरलेलं लक्ष्य साध्य केलं आहे.