बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाचा हल्ला झालाच नाही, असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. बालाकोटमध्ये हल्ला झाल्याची कबुली खुद्द जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या भावानं दिली आहे. मसूदच्या भावानं पाकिस्तानमध्ये केलेल्या भाषणात हल्ल्याबद्दल भारताला दोष दिलाय आणि बदला घेण्याची भाषा केलीय. तसंच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडल्याबद्दल इम्रान खान सरकारवही टीका केलीय.