साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 27 जानेवारी : अहमदनगरला जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनी अश्लील गाण्यावर चिमुरड्या मुला-मुलींना नाचवण्यात आलं. शेवगाव तालुक्यातील जोहरापूर या गावात २६ जानेवारीच्या दिवशी 'पोरगी माझ्या मामाची' गाण्यावर मुलांना नाचायला सांगितलं. बरं इतकंच नाही तर या चिमुरड्यांच्या अंगावर एका शिक्षकाने चॉकलेट उधळली. खळबळजनक म्हणजे राष्ट्रध्वजासमोर हा प्रकार चालू होता. उद्याची भावी पिढी आश्याप्रकारे शिक्षक घडवणार असतील तर या देशाचे भवितव्य कसं घडणार असा सवाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होतो.