नवी मुंबई, 25 जुलै : नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा भडका उडाला आहे. नवी मुंबईच्या कळंबोली हायवेवर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक त्यामळे जमावाला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने पोलिसांना नाईलाजाने हा गोळीबार करावा लागला. यात कोणीही जखमी झाले नसून आता परिस्थिती नियंत्रात आणण्याचं काम सुरू आहे.