#maratha

Showing of 14 - 27 from 175 results
'कोण म्हणतं देणार नाही..,'अन् अमिता चव्हाण यांची अशोक चव्हाणांच्या घराबाहेर घोषणाबाजी

व्हिडिओAug 7, 2018

'कोण म्हणतं देणार नाही..,'अन् अमिता चव्हाण यांची अशोक चव्हाणांच्या घराबाहेर घोषणाबाजी

नांदेड, 07 आॅगस्ट : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चव्हाण यांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी जमले होते. घरासमोर आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणा ऐकून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण ह्या खाली आल्या. आल्या आल्या अमिता चव्हाण यांनी देखील मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. 'मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही...घेतल्याशिवाय राहणार नाही' अशा घोषणाच अमिता चव्हाण यांनी दिल्या. त्यानंतर त्या देखील ठिय्यामध्ये सहभागी झाल्या. अमिता चव्हाण आणि आमदार डी. पी सावंत दोघेही आंदोलकांसोबत रस्त्यावर बसले. ठिय्या संपल्यानंतर पुन्हा अमिता चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.

Live TV

News18 Lokmat
close