#maratha aarakshan

Showing of 1 - 14 from 28 results
VIDEO: धुळ्यात मराठा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज

बातम्याAug 5, 2018

VIDEO: धुळ्यात मराठा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज

धुळे, ०५ ऑगस्ट- धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांना मराठा आंदोलनकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धुळ्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीत भुसे यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच खासदार हिना गावित यांची गाडीही आंदोलकांनी फोडल्याचे समोर आले आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खासदार हिना गाडीत असतानाच ही तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून गाडीवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोळा दिवस चालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने, राग व्यक्त करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पालकमंत्री भुसे यांनी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितल आहे. तसेच आंदोलकांच्या भावना सरकार दरबारी पोहचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. तरीही आंदोलकांनी त्यांचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.