ठाणे, 04 ऑगस्ट : राज्यभरात पावसाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून लोकलसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील खडवली नजीकच्या जू गावात अडकलेल्या 59 नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुखरूप सुटका करण्यात आली.