मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचं लोण मालेगावमध्ये देखील पोहोचलं आहे. मालेगाव शहरातील अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुलं पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.