#maharshtra

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

महाराष्ट्रSep 18, 2018

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

चंद्रपुर, 18 सप्टेंबर : मित्रासोबत वाद झाल्यानंतर मैत्रिणीने चक्क चाकू मारून तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना चंद्रपूर जिल्हयात घडली आहे. या युवतीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागभीड इथ रात्री ही घटना घडलीये. किशोर पाथोडे आणि ममता बनकर या दोघात वादाविवाद झाला त्यानंतर नागभीडच्या विश्रामगृहासमोरच्या रस्त्यावर या युवतीने तरुणावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. या दरम्यान युवतीही जखमी झाली होती. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने तरुणाला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे. दरम्यान युवतीवरही उपचार सुरू असून आज सकाळी या तरुणीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भादवि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघामध्ये नेमका कशावरून वाद झाला याची चौकशी नागभीड पोलीस करतायत.

Live TV

News18 Lokmat
close