#latest

Showing of 1 - 14 from 278 results
VIDEO: युतीवर नाराज, अर्जुन खोतकरांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर

बातम्याFeb 21, 2019

VIDEO: युतीवर नाराज, अर्जुन खोतकरांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर

मुंबई, 21 फेब्रुवारी : सेनेचे मराठवाड्यातील पशुसंवर्धन मंत्री नेते अर्जुन खोतकर यांनी स्वपक्षाविषयी व्यासपीठावरून टिपण्णी केली आहे. युती झाल्यामुळे आता दानवेंविरोधात निवडणूक लढू शकणार नाही. त्यामुळे यावर नाराज होत खोतकरांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. खोतकर हे सध्या नाराज आहेत. कारण रावसाहेब दानवेंविरोधात आपण निवडणूक लढवणारच, असं खोतकरांनी जाहीर केलं होतं. पण आता युती झाल्यामुळे शिवसेना त्यांना दानवेंविरोधात उभं राहू देण्याची शक्यता फारच कमी आहे. 'ग्रामीण भागातलं बदनाम क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र' आहे असं म्हणत यात आणखी लक्ष देण्याची गरज असल्याचं ते एकनाथ शिंदे यांना म्हणाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close