#latest update

VIDEO : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद; नाशिक वन विभागाला यश

व्हिडिओFeb 17, 2019

VIDEO : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद; नाशिक वन विभागाला यश

नाशिक, 17 फेब्रुवारी : नाशिकच्या सावरकर नगरमध्ये सकाळपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याच्या हल्ल्यात एक वन कर्मचारी जखमी झाला होता. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं. इथल्या गणपती मंदिराजवळ तो नागरिकांना दिसला. एका बंगल्याच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यातसुद्धा तो कैद झाला. त्याला पकडण्यासाठी नाशिक वन विभागाने युद्धस्तरावर मोहीम हातात घेतली होती. दरम्यान, त्या बिबट्यानं एका वन कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केलं. मिळेल त्या दिशेने तो धावत सुटलेल्या आणि दिसेल त्याच्यावर झडप घालत होता. अखेर वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं मोठ्या शिताफिनं त्याला जेरबंद केलं. तर बिबट्या पकडल्या गेल्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. संपूर्ण नाशिक शहरात आज बिबट्याचीच चर्चा सुरू आहे.