#krushna river

VIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'

व्हिडिओNov 11, 2018

VIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'

सांगली, 11 नोव्हेंबर : सांगलीतल्या कृष्णा नदीकाठी रविवारी एक अनोखा उपक्रम पार पडला. आबालवृद्धांनी याठिकाणी चक्क 'मडबाथ' अर्थात मातीच्या चिखलात स्नान केलं. दिवाळीतीलं अभ्यंगस्नान हे आपल्याला माहिती आहे, पण 'मडबाथ' हा शब्द वाचून तुम्हाला कदाचित थोडं नवल वाटलं असेल. निसर्गोपचार दिनानिमित्त पद्माळे इथल्या एका सामाजिक संस्थेच्यावतीने कृष्णानदीकाठी मातीच्या आंघोळीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या आगळा-वेगळा उपक्रम सहभागी झालेल्या पन्नासहून अधीक अबालवृद्धांनी अगदी मनसोक्त मातीत आंघोळ करण्याचा आनंद लुटला. यात सहभागी झालेल्यांनी एकमेकांना माती लावण्याचाही आनंद लुटला. अशी ही अनोखी चिखलाची आंघोळ पाहण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात नदीकाठी जमले होते. शरीराच्या अनेक व्याधी या मातीमुळे दूर होतात, त्यामुळे प्राचीन काळापासून माती ही आयुर्वेदिक उपचारासाठी वापरली जाते. मातीचं आयुर्वेदिक महत्व सर्वांना कळावं यासाठी हा आगळा-वेगळ्या उपक्रम आयोजित करण्यात आला, अशी माहिती जय भगवान योग परिवाराचे मोहन जगताप यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

Live TV

News18 Lokmat
close