Elec-widget

#krishna

Showing of 53 - 66 from 119 results
SPECIAL REPORT : सुजय विखे काढणार का आजोबांच्या पराभवाचा वचपा?

स्पेशल स्टोरीMar 12, 2019

SPECIAL REPORT : सुजय विखे काढणार का आजोबांच्या पराभवाचा वचपा?

सागर कुलकर्णी आणि विवेक कुलकर्णी, मुंबई, 12 मार्च : अहमदनगरची लोकसभा लढण्यासाठी अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. नगरची जागा जिंकून देण्याच्या निकषावरच सुजय विखेंना भाजपने रेड कार्पेट टाकलं आहे. पण आता सुजयसमोरचं आव्हानही खडतर असणार आहे. कारण, पवारांनी नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा 1991च्या पुनरावृत्तीचा घाट घातला आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पूत्र प्रशांत गडाख यांना सुजयच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं. त्यासाठी पवार नेहमीप्रमाणेच सर्व विखे विरोधकांची पुन्हा मोटही बांधतील त्यामुळे पवारांचं हे चक्रव्यूह भेदून सुजय आजोबांच्या पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.